Tuesday, 13 March 2012

सोनिया गांधींकडे 45 हजार कोटींची संपत्ती असल्‍याचा दावा

जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्‍यक्‍तींमध्‍ये कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांचा चौथा क्रमांक असल्‍याचा दावा अमेरिकेतील एका वेबसाईटने केला आहे. सोनिया गांधींकडे सुमारे 10 हजार ते 45 हजार कोटी रूपयांची (दोन ते 19 अब्‍ज डॉलर) संपत्ती असल्‍याचे या साईटने म्‍हटले आहे.

अमेरिकेतील वेबसाईट 'बिझनेस इनसायडर' ने जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्‍यक्‍तींची यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये त्‍यांनी सोनिया गांधी यांना चौथ्‍या स्‍थानी ठेवले आहे. या यादीमध्‍ये हरियाणाच्‍या आमदार आणि जिंदाल उद्योग समूहाच्‍या प्रमूख सावित्री जिंदाल यांचाही समावेश करण्‍यात आला आहे.

यापूर्वीही जर्मनीच्‍या डी वेल्‍ट या वृत्तपत्रातही अशाच प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तपत्रामध्‍ये जगातील सर्वात श्रीमंत 23 नेत्‍यांची यादी प्रकाशित करण्‍यात आली होती. यामध्‍येही सोनिया गांधी चौथ्‍या स्‍थानीच होत्‍या. जागतिक लक्‍जरी गाईडचा हवाला देऊन बिझनेस इनसायडरने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्‍याशिवाय या बातमीच्‍या खाली त्‍यांनी ही माहिती OpenSecrets.org, Forbes.com, Bloomberg.com, Wikipedia.org, Guardian.co.uk यांच्‍या आधारे तयार करण्‍यात आल्‍याचे म्‍हटले आहे.

यादीतील प्रमूख नावे

1. अब्‍दुल्‍लाह बिन अब्‍दुल अजीज शाह, सौदी अरेबिया

2. हसन बोलखेह सुलतान, ब्रुनेए

3. मायकल ब्‍लूमबर्ग मेयर, न्‍यूयॉर्क

4. सोनिया गांधी

6. ब्‍लादीमिर पुतिन

7. सावित्री जिंदाल

19.अ‍ासिफअली झरदारी

नुकतेच एका आरटीआय कार्यकर्त्‍याने सोनिया गांधी यांना प्राप्‍तीकर विवरण पत्राची माहिती मागितली होती. परंतु, वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्‍यास त्‍यांनी नकार दिला होता. सोनिया गांधींनी 2009 च्‍या लोकसभा निवडणुकीत आपली एकूण संपत्‍ती 1.38 कोटी रूपये असल्‍याचे घोषित केले होते. बिझनेस इनसायडरने दिलेली संपत्तीची माहिती आणि विवरण पत्रातील संपत्ती यामध्‍ये जमीन-आस्‍मानचा फरक दिसून येतो.

....................

No comments:

Post a Comment