एखादी व्यक्ती मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये राहत असेल आणि दिवसाला किमान ३२ रुपये खर्च करत असेल तर ती व्यक्ती गरीब नाही. हा अजब निष्कर्ष नियोजन आयोगाने काढला आहे.योजना आयोगाचं म्हणणं आहे की,एक व्यक्ती एका दिवसात १ रुपया २० पैसे खर्च करुन खाण्याच्या थाळीत वरणाचा बंदोबस्त करु शकतो
५ रुपये ५० पैसे तांदूळ-गव्हासाठी पुरेसे आहेत २ रुपये ३३ पैसे दूध पिण्यासाठी फार आहेत १ रुपया ९५ पैसे हिरव्या भाज्यांसाठी खूप आहे १ रुपया ५५ पैसे खाण्याच्या तेलासाठी पुरेसे आहेत ४४ पैसे फळांसाठी पुरेसे आहेत ७० पैसे साखरेसाठी पुरेसे आहेत मीठ-मसाल्यासाठी ७८ पैसे पुरेसे आहेत ३ रुपये ७५ पैसे गॅस सिलेंडर किंवा रॉकेलसाठी पुरेसे आहेत अभ्यासासाठी ९९ पैसे पुरेसे आहेत महिन्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ६१ रुपये ३० पैसे पुरेसे आहेत ९ रुपये ६० रुपये चप्पल बुटांसाठी पुरेसे आहेत घर खरेदी करण्यासाठी किंवा घरभाडं देण्यासाठी ४९ रुपये १० पैसे महिन्यासाठी पुरेसे आहेत.
No comments:
Post a Comment